Na
About book : गुरुदेव रवींद्रनाथ टागोर , नोबल पारितोषिक प्राप्त काव्यका मराठी मे अनुवाद.
About author : डॉ . शशिकला जयंत कर्डिले या गणित या विषयात एम. एस्सी झाल्या, नंतर अनेक वर्षे प्राध्यापिकेचे काम करीत होत्या. परंतु साहित्याची विशेष आवड असल्या, ने त्यांनी हिंदी विषयात विद्यावाचस्पती पदवी प्राप्त केली. त्यांनी गणित विषयात महाविद्यालयीन विदयार्थ्यासाठी अनेक क्रमिक पुस्तके लिहिली, गणित विषयावर "उगम गणिताचा ' हेही पुस्तक लिहिले . त्यानंतर त्या ललित लेखनाकडे वळल्या, काही स्वतंत्र पुस्तकांसह त्यांनी अनुवादात्मक पुस्तकांचे लेखन हि केले. महान व्यक्तींची अनॆक आटोपशीर बालचरित्रे हि लिहली. वि. वा. शिरवाडकर यांच्या ' जान्हवी ' आणि 'वैष्णव ' या कादंबऱ्या आणि जोमानंद स्वामी यांच्या 'प्राणप्रतिष्ठा ' या पुस्तकांचे मराठीतून हिंदीत अनुवाद केले. धर्मवीर भारती यांच्या 'अंधायुग ' या काव्याचे आणि नरेश मेहता यांच्या 'संशय की एक रात ' या हिंदी काव्याचे त्यांनी अनुक्रमे 'अंधायुग ' आणि ' एक रात्र प्रश्नाकित' या शीर्षकाने मराठीत अनुवाद केले. विशेष म्हणजे जे. कृष्णमूर्ती यांची पुस्तके सुगम मराठीत आणण्याचा मान त्यांना जातो. त्यांत 'कृष्णमूर्तीची रॊजनिशी ',' निवडक वेचे ', 'परस्पर संबंध' , 'ईश्वराचा शोध', 'जेव्हा तुमची तुलना केल्याने तूम्ही दुखावले जाता', 'तुमच्यातील सुप्त प्रतिभा ओळखा', 'शाळा तुम्हाला जीवनासाठी तयार करते का' ?,' भावना प्रचंड असू द्या त्याचे भय बाळगू नका', 'कंटाळवाणेपणा आणि करमणुकीचा उद्योगधंदा', या शीर्षकाने अनुवाद केलेल्या पुस्तकांचा समावेश आहे. त्यांनी मासिकातूनही लेखन केले आहे. आणि मराठीचे आदय कवी मुकुंदराज यांच्या 'सार्थपरमामृत ‘ या पुस्तकाचा वेद्प्रदिप या मासिकातून हिंदी अनुवाद हि प्रसिध्द केला आहे. या शिवाय त्यांनी जे. कृष्णमूर्ती, अब्दुल कलाम, स्वामी विवेकानंद, संत गाडगे महाराज, राणा प्रताप, लोकमान्य टिळक संत मुक्ताबाई आदी अनेक मान्यवर व्यक्तींची चरित्रे लिहिलेली आहेत. तसेच गुगलचे लैरी पेज, अमेझॉनचे बोझेस, फेसबुकचे झुकेरबर्ग यांची चरित्रे लिहिलेली आहेत. त्याचप्रमाणे पौराणिक व्यक्तींचीही चरित्रे लिहिलेली आहेत .त्यात अश्वत्थामा, दुर्योधन ,रावण आदींचा समावेश आहे. अशा प्रकारे त्यांनी अनेक ऐतिहासिक, पौर