Na
About author : डॉ . शशिकला जयंत कर्डिले या गणित या विषयात एम. एस्सी झाल्या, नंतर अनेक वर्षे प्राध्यापिकेचे काम करीत होत्या. परंतु साहित्याची विशेष आवड असल्या, ने त्यांनी हिंदी विषयात विद्यावाचस्पती पदवी प्राप्त केली. त्यांनी गणित विषयात महाविद्यालयीन विदयार्थ्यासाठी अनेक क्रमिक पुस्तके लिहिली, गणित विषयावर "उगम गणिताचा ' हेही पुस्तक लिहिले . त्यानंतर त्या ललित लेखनाकडे वळल्या, काही स्वतंत्र पुस्तकांसह त्यांनी अनुवादात्मक पुस्तकांचे लेखन हि केले. महान व्यक्तींची अनॆक आटोपशीर बालचरित्रे हि लिहली. वि. वा. शिरवाडकर यांच्या ' जान्हवी ' आणि 'वैष्णव ' या कादंबऱ्या आणि जोमानंद स्वामी यांच्या 'प्राणप्रतिष्ठा ' या पुस्तकांचे मराठीतून हिंदीत अनुवाद केले. धर्मवीर भारती यांच्या 'अंधायुग ' या काव्याचे आणि नरेश मेहता यांच्या 'संशय की एक रात ' या हिंदी काव्याचे त्यांनी अनुक्रमे 'अंधायुग ' आणि ' एक रात्र प्रश्नाकित' या शीर्षकाने मराठीत अनुवाद केले. विशेष म्हणजे जे. कृष्णमूर्ती यांची पुस्तके सुगम मराठीत आणण्याचा मान त्यांना जातो. त्यांत 'कृष्णमूर्तीची रॊजनिशी ',' निवडक वेचे ', 'परस्पर संबंध' , 'ईश्वराचा शोध', 'जेव्हा तुमची तुलना केल्याने तूम्ही दुखावले जाता', 'तुमच्यातील सुप्त प्रतिभा ओळखा', 'शाळा तुम्हाला जीवनासाठी तयार करते का' ?,' भावना प्रचंड असू द्या त्याचे भय बाळगू नका', 'कंटाळवाणेपणा आणि करमणुकीचा उद्योगधंदा', या शीर्षकाने अनुवाद केलेल्या पुस्तकांचा समावेश आहे. त्यांनी मासिकातूनही लेखन केले आहे. आणि मराठीचे आदय कवी मुकुंदराज यांच्या 'सार्थपरमामृत ‘ या पुस्तकाचा वेद्प्रदिप या मासिकातून हिंदी अनुवाद हि प्रसिध्द केला आहे. या शिवाय त्यांनी जे. कृष्णमूर्ती, अब्दुल कलाम, स्वामी विवेकानंद, संत गाडगे महाराज, राणा प्रताप, लोकमान्य टिळक संत मुक्ताबाई आदी अनेक मान्यवर व्यक्तींची चरित्रे लिहिलेली आहेत. तसेच गुगलचे लैरी पेज, अमेझॉनचे बोझेस, फेसबुकचे झुकेरबर्ग यांची चरित्रे लिहिलेली आहेत. त्याचप्रमाणे पौराणिक व्यक्तींचीही चरित्रे लिहिलेली आहेत .त्यात अश्वत्थामा, दुर्योधन ,रावण आदींचा समावेश आहे. अशा प्रकारे त्यांनी
About book : आत्मजयी आत्मजयी हा हिंदी साहित्य जगतातील महान साहित्यिक कुंवर नारायण यांच्या 'आत्मजयी' नावाच्या महाकाव्यसदृश कवितांचा अनुवाद आहे. कठोपनिषदातील नचिकेता या व्यक्तिमत्त्वाच्या जीवनावर आधारित ही साहित्यकृती आहे. कुंवर नारायण ज्ञानपीठ पारितोषक विजेते, पद्मभूषण उपाधी विभूषित आणि अनेक सन्माननीय उपाधींनी सन्मानित झालेले श्रेष्ठ साहित्यिक आहेत. आत्मजयी, जीवन आणि मृत्यू , पिता आणि पुत्र , परंपरा आणि आधुनिकता यांच्यातील आध्यात्मिक संवाद आहे. आत्मजयी म्हणजे स्वतःला जिंकणारा. कठोपनिषदातील वाजश्रेयस ऋषी एका महायज्ञात आपले सर्व ऐहिक वैभव दान करायचे योजतात . मात्र त्यांच्या पुत्राला त्यांचे हे दान दांभिक वाटते कारण ते अशा अनेक ऐहिक वस्तूंचे दान करतात की ज्या निरुपयोगी आणि मूल्यहीन झाल्या आहेत. त्यांनी दान केलेल्या गायी वृद्ध आणि भाकड झालेल्या असतात. अशा दानामुळे चिंताचुर झालेला त्यांचा पुत्र नचिकेता त्यांना आपली शंका व्यक्त करीत म्हणतो “ प्रिय पिताजी , आपण माझे दान कोणाला देणार? ” संतप्त झालेले पिताजी त्यावर उत्तर देतात “ तुझे दान मी मृत्यूला करणार आहे.” नचिकेत हे मान्य करून मृत्यूकडे म्हणजे यमदेवाकडे जातो. त्यावेळी यमदेव घरी नसल्याने नचिकेता त्यांच्या दाराशी तीन दिवस अन्न पाण्याशिवाय उपाशी बसून राहतो. यमदेव घरी परतल्यावर आपल्या अतिथीला असे उपोषित बसावे लागल्याने अत्यंत दुःखी होतात आणि आपल्या अतिथीची क्षमा मागतात आणि त्याची भरपाई म्हणून अतिथीला तीन वर मागायला सांगतात. नचिकेताने यमदेवाकडे मागितलेल्या तीन वरांपैकी पहिले दोन वर यमदेव त्याला देतात. परंतु तिसरा वर देण्यास ते तयार होत नाहीत कारण तिसऱ्या वराने नचिकेत त्यांना म्हणतो की मानवाच्या मनाच्या आकलना पलीकडे असलेले आत्म्याचे ज्ञान मला द्या आणि तसेच मृत्यूनंतर मानवाचे काय होते ते मला सांगा. अर्थातच यमदेव हे मान्य करीत नाहीत. ते नचिकेतला म्हणतात " हे मान्य करणे मला शक्य नाही. त्याच्या बदल्यात जगातील सर्व ऐहिक वैभव वा तू जे काही अन्य मागशील ते देण्यास मी तयार आहे." मात्र नचिकेत आपल्या मागणीबाबत ठाम असतो.अखेर यमदेवाला त्याची मागणी पूर्ण करावी लागते. आत्मजयी हे आध्यात्मिक काव्य यमदेव आणि नचिकेत या दोघांमधील अध्यात्मिक सवांद आहे त्या मुळे हे काव्य अत्यंत रसपूर्ण, मनोवेधक आणि वाचनीय झाले आहे.