Na
About book : या पुस्तकातून राधे चा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय साहित्यातून तसेच विविध ग्रंथातून जिचे अस्तित्व प्रकर्षाने जाणवते अशी ती सौंदर्य शालिनी , श्रीकृष्णा वर जीव ओवाळून टाकणारी परकीया असूनही जिचे प्रेम ऐहिकता आणि पारमार्थीकिता यांच्या सीमा ओलांडून अलौकिकता व पारमार्थीकिता दिव्यत्वा पर्यन्त गेले आहे, अशा अनन्य प्रेमिका राधेचे चरित्र आणि चारित्र्य पृथ्वी तलावा वरील मानव जातीला जिज्ञासा आणि कुतूहलाचा विषयात ठरला आहे. या मुळेच आम्हीही तिच्याकडे अनाहूतपणे आकर्षित झालो आणि साहित्यात राधेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. हा लेखंन प्रपंच म्हणजे त्याचीच फलप्राप्ती. रसिकांसाठी ते वाचनीय आणि मनोवेधक झाले आहे.
About author : 1) डॉ . शशिकला जयंत कर्डिले या गणित या विषयात एम. एस्सी झाल्या, नंतर अनेक वर्षे प्राध्यापिकेचे काम करीत होत्या. परंतु साहित्याची विशेष आवड असल्या, ने त्यांनी हिंदी विषयात विद्यावाचस्पती पदवी प्राप्त केली. त्यांनी गणित विषयात महाविद्यालयीन विदयार्थ्यासाठी अनेक क्रमिक पुस्तके लिहिली, गणित विषयावर "उगम गणिताचा ' हेही पुस्तक लिहिले . त्यानंतर त्या ललित लेखनाकडे वळल्या, काही स्वतंत्र पुस्तकांसह त्यांनी अनुवादात्मक पुस्तकांचे लेखन हि केले. महान व्यक्तींची अनॆक आटोपशीर बालचरित्रे हि लिहली. वि. वा. शिरवाडकर यांच्या ' जान्हवी ' आणि 'वैष्णव ' या कादंबऱ्या आणि जोमानंद स्वामी यांच्या 'प्राणप्रतिष्ठा ' या पुस्तकांचे मराठीतून हिंदीत अनुवाद केले. धर्मवीर भारती यांच्या 'अंधायुग ' या काव्याचे आणि नरेश मेहता यांच्या 'संशय की एक रात ' या हिंदी काव्याचे त्यांनी अनुक्रमे 'अंधायुग ' आणि ' एक रात्र प्रश्नाकित' या शीर्षकाने मराठीत अनुवाद केले. विशेष म्हणजे जे. कृष्णमूर्ती यांची पुस्तके सुगम मराठीत आणण्याचा मान त्यांना जातो. त्यांत 'कृष्णमूर्तीची रॊजनिशी ',' निवडक वेचे ', 'परस्पर संबंध' , 'ईश्वराचा शोध', 'जेव्हा तुमची तुलना केल्याने तूम्ही दुखावले जाता', 'तुमच्यातील सुप्त प्रतिभा ओळखा', 'शाळा तुम्हाला जीवनासाठी तयार करते का' ?,' भावना प्रचंड असू द्या त्याचे भय बाळगू नका', 'कंटाळवाणेपणा आणि करमणुकीचा उद्योगधंदा', या शीर्षकाने अनुवाद केलेल्या पुस्तकांचा समावेश आहे. त्यांनी मासिकातूनही लेखन केले आहे. आणि मराठीचे आदय कवी मुकुंदराज यांच्या 'सार्थपरमामृत ‘ या पुस्तकाचा वेद्प्रदिप या मासिकातून हिंदी अनुवाद हि प्रसिध्द केला आहे. या शिवाय त्यांनी जे. कृष्णमूर्ती, अब्दुल कलाम, स्वामी विवेकानंद, संत गाडगे महाराज, राणा प्रताप, लोकमान्य टिळक संत मुक्ताबाई आदी अनेक मान्यवर व्यक्तींची चरित्रे लिहिलेली आहेत. तसेच गुगलचे लैरी पेज, अमेझॉनचे बोझेस, फेसबुकचे झुकेरबर्ग यांची चरित्रे लिहिलेली आहेत. त्याचप्रमाणे पौराणिक व्यक्तींचीही चरित्रे लिहिलेली आहेत .त्यात अश्वत्थामा, दुर्योधन ,रावण आदींचा समावेश आहे. अशा प्रकारे त्यांनी