ISBN : 978-93-6087-704-0
Category : Non Fiction
Catalogue : Self Help
ID : SB20957
Paperback
300.00
e Book
300.00
Pages : 166
Language : Marathi
पुस्तका विषयी: व्यक्तिमत्व विकासाची शिदोरी या पुस्तकामध्ये व्यक्तींच्या खास गुणांचे, वैशिष्ट्यांचे व त्यांच्या शक्तिशाली सवयीच्या विविध पैलूंच मार्गदर्शन या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. कोणत्याही माणसाचं व्यक्तिमत्व हे त्याच्याकडे असणाऱ्या गुणावरती अवलंबून असते. जगातील सर्वात कठीण व अवघड काम म्हणजे स्वतःवरती नियंत्रण ठेवणे. स्वतःला चांगल्या सवयी लावून घेणे. स्वतःला एक प्रकारची शिस्त लावून घेणे. स्वतःची मानसिकता घडवणे. स्वतःच्या मनाला सक्षम बनवणे. याच गोष्टींचा रोज थोडा-थोडा स्वतःमध्ये बदल करत जाणे. असे अनेक घटक या पुस्तकामध्ये तुम्हाला अभ्यासायला मिळतील ज्याच्यामुळे, तुम्हाला तुमच्या जीवनत परिवर्तन करणे व ध्येयापर्यंत पोहोचणे शक्य होईल. सामाजिक किंवा कोणत्याही समस्या तुम्हाला इतरांकडून सोडवून मिळतील परंतु, तुमची व्यक्तिगत समस्या तुम्हाला स्वतःलाच सोडवायची असते आणि तिच्यावरती नियंत्रण ठेवायचे असते. स्वतःच्या अंतर्मनाशी सातत्याने संपर्कात राहिला शिकले पाहिजे. प्रत्येक वाचकाला, मी विचाराने श्रीमंत करण्याचा वसा जणू या पुस्तकाच्या माध्यमाद्वारे घेतलेला आहे. हे पुस्तक तुमचा जीव की प्राण झाले पाहिजे. मुलाखती दरम्यान मी पाहिलेली व्यक्तिमत्व त्यांच्याकडे सर्व काही असूनसुद्धा, योग्य मार्गदर्शनाच्या अभावी ते यश प्राप्त करू शकले नाहीत. डोक्यातील विचारांचा काहूर व गोंधळलेल्या अवस्थेतून स्वतःला बाहेर काढण्याचा एकमेव मार्ग असतो, तो म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये असणारी स्पष्टता. जी आपल्या विचाराच्या माध्यमातून पोहोचते. असेच विविध पैलू व घटक या पुस्तकातून तुम्ही घेण्याचा प्रयत्न करत रहा. तुम्हाला तुमचा सकारात्मक दृष्टिकोन व आत्मविश्वास वाढवण्यास हे पुस्तक मदत करेल. सामान्य माणसं असामान्य विचार करू शकतात कारण त्यांना ती संधी मिळालेली असते. माझं दुसरं पुस्तक व्यक्तिमत्व विकासाचा केंद्रबिंदू याही पुस्तकात तुम्हाला विचारांनी श्रीमंत करण्याचा खजिना सापडेल. तुम्ही नक्की ही दोन्ही पुस्तके वाचा व स्वतःमध्ये परिवर्तन करून घ्या. तुम्ही एकदा विचाराने श्रीमंत झाला की अमाप संपत्ती मिळवू शकाल. नक्कीच तुम्हाला हे दोन्ही पुस्तके आवडतील व आज तुम्ही हे दोन्ही पुस्तके घरी घेऊन जाल अशी मी अपेक्षा करतो.