shashwatsuport@gmail.com +91 7000072109 B-75, Krishna Vihar, Koni, Bilaspur, C.G 495001
Mon - Sat 10:00 AM to 5:00 PM
Book Image
Book Image
Book Image
ISBN : 978-93-6087-899-3
Category : Non Fiction
Catalogue : Self-Help
ID : SB20883

व्यक्तिमत्व विकासाचा केंद्रबिंदू

व्यक्तिमत्व विकासाचा केंद्रबिंदू
 5.0

Nanasaheb S. Kolage

Paperback
300.00
e Book
300.00
Pages : 168
Language : Marathi
PAPERBACK Price : 300.00

About author : मानव संसाधन विभागात काम करत असताना मला विविध गोष्टींचा व व्यक्तिमत्त्वांच्या पैलूंचा अभ्यास करायला मिळाला ही मी माझ्या भाग्याची गोष्ट मानतो. विविध आस्थापनेमध्ये काम करत असताना विविध प्रकारचे व्यक्तिमत्व पाहिलेली आहेत. समाजामध्ये वावरत असताना किंवा कोणत्याही कार्यक्षेत्रात काम करत असताना व्यक्तींचे वैशिष्ट्य आणि त्यांचे वर्तन हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो. अशा गतिमान व्यक्तिमत्त्वाच्या वर्तणुकीच्या पैलूंचा मी अभ्यास केलेला आहे. केवळ स्वतःच्या वर्तणुकीचे बारकाईने निरीक्षण केल्याने मी माझ्या व माझ्या सवयीत खूप काही बदल करू शकलो. जरी माझे पदवी पर्यंतचे शिक्षण ग्रामीण भागात व तसेच तालुक्याच्या ठिकाणी झालेले असल्यामुळे सातत्याने एक उणीव भासत राहिली ती म्हणजे स्वतःचा व्यक्तिमत्व विकास. पुण्यासारख्या शहरांमध्ये आल्यानंतर हा अभाव मोठ्या प्रमाणात माझ्यामध्ये जाणवू लागला व मी माझ्या दृढ निश्चयाने व तीव्र इच्छाचया जोरावरती व्यक्तिमत्व विकासाचा अभ्यास करण्याचा विडा उचलला. 2007 पासून विविध आस्थापनेमध्ये काम करत असताना सुद्धा मी माझे शिक्षण कधीही थांबू दिले नाही. बी.एची पदवी घेतल्यानंतर, एम. पी. एम, डी एल एल अँड एल डब्ल्यू, एलएलबी, एलएलएम अशाप्रकारे शैक्षणिक पदव्या प्राप्त केल्या त्या केवळ प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावरती. मी थोडा धार्मिक असल्यामुळे मला माझ्यामध्ये बदल करण्यास व सकारात्मक विचार उत्पन्न करण्यास कोणताही अडथळा निर्माण झाला नाही. पर्यायी अनेक चांगल्या सवयी मी स्वतःला लावून घेतल्या. ध्येय ठरवणे, उद्दिष्ट पूर्ण करणे, जिद्द, चिकाटी, उत्साह, धाडस, आत्मविश्वास अशा अनेक पैलूला मी माझ्यात सामावून घेतले. लोकांच्या हसण्याकडे, अपमानाकडे, नकारात्मक वृत्तीकडे नेहमी दुर्लक्ष करत राहिलो, त्यामुळेच तर आज हा दिवस उजाडला असे म्हणायला हरकत नाही. कल्याणी टेक्नोफोर्ज लिमिटेड (भारत फोर्ज) तसेच रिंग प्लस अक्वा लिमिटेड (रेमंड ग्रुप) यासारख्या नामांकित कंपन्यासोबत मी चांगल्या पदावरती काम केले आहे. व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय याचा प्रत्यक्ष अनुभव मी घेतलेला आहे. माझ्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येक मित्राला, सहकार्याला विद्यार्थ्यांना तसेच थोरा-मोठ्यांना माझ्याकडे असणाऱ्या थोड्याफार ज्ञानाचा उपयोग त्यांनाही करून दिला. मनुष्याच्या जीवनामध्ये त्यांचे वर्तन व चारित्र्य हेच त्यांची गडगंज श्र

About book : व्यक्तिमत्व विकासाचा केंद्रबिंदू या पुस्तकांमध्ये तुम्हाला तुमच्या स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास कसा करायला हवा, आपल्या सवयी कोणत्या आहेत व त्या कशा ओळखाव्या, जिद्द कशी निर्माण करता यावी, वेळेचा सदुपयोग कसा करावा, आपल्या विचारांची उत्पत्ती, आपला सकारात्मक दृष्टिकोन किती महत्त्वाचा असतो असे अनेक धडे या पुस्तकात तुम्हाला बघायला मिळणार आहेत. हे पुस्तक तुमचं पूर्ण जीवन बदलून टाकेल जर का तुम्ही स्वतःला बदलण्याचा हेतूपूर्वक प्रयत्न केली तर, तुम्ही तुमचं जीवन नक्कीच बदलू शकाल. कोणत्याही क्षेत्रात यश मिळवणे इतके सोपे नाही किंवा इतके अवघडही नाही. त्याला हवी ती एक समजदार समज. विविध व्यक्तिमत्त्वाचे पैलू या पुस्तकात तुम्हाला अभ्यासायला मिळणार आहेत खरोखर जर तुम्ही मन लावून या पुस्तकात दिलेल्या व्यक्तिमत्व विकासाचा अभ्यास केला तर यश तुम्हाला दूर नाही.

Customer Reviews

Mr Nanasaheb S Kolage : This book is very important to all of us for personality development. 14 February 2024


 

Book from same catalogue