ISBN : 978-93-90761-33-3
Category : Non Fiction
Catalogue : Social
ID : SB20132
Paperback
399.00
e Book
199.00
Pages : 260
Language : Marathi
राजाराम निमाजी कोकरे या प्राथमिक शिक्षकाने जे भोगले आहे, जे सोसले आहे, जे त्यागले आहे, जे योजले आहे आणि त्यातून जे साजले आहे; ते शब्दात उतरवण्याचे काम नव्या पिढीच्या मार्गदर्शनासाठी आवश्यक आहे. ग्रामीण कृषी संस्कृतीशी असणारी नाळ, बहुजन समाजाची झालेली अवहेलना, भाकरीचा प्रश्न सोडवताना होणारी तारांबळ, त्यातून शिकण्याची लागलेली आस या बाबी राजाराम कोकरे या तरुणाला शिक्षक बनवतात. शिक्षक होईपर्यंत लागलेली शिकण्याची आणि शिक्षक झाल्यावर लागलेली शिकवण्याची आस केवळ त्यांचे स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवत नाही; तर ते एका समाजाचं आणि काही पिढ्यंाचं व्यक्तिमत्त्व घडवते. त्यांच्या प्रामाणिक कष्टाने आज कोकरेवस्ती हे एक शिक्षणाचं बेट तयार झाले असून या शिक्षणाच्या बेटाचा तीन पिढ्याांचा प्रवास बहुजन समाजाला भविष्यातल्या अनेक पिढ्यांकरता दीपस्तंभ बनून उभा राहील यात शंका नाही.