ISBN : 978-81-19517-11-4
Category : Non Fiction
Catalogue : Self Help
ID : SB20648
Paperback
349.00
e Book
199.00
Pages : 136
Language : Marathi
सध्याचे एकविसावे शतक हे खूपच आव्हानांचं शतक आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या व्यक्तिगत, शारिरीक, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक व व्यावसायिक या सर्वच क्षेत्रात आरोग्यदायी व आनंदी राहून यशस्वी व्हायचे असेल तर अधिक कार्यक्षम (हायपरफॉर्मर्स) बनणे आवश्यक आहे. माणूस हा समाजशील प्राणी आहे आणि अनुकरण हा प्रत्येक मानवाचा उपजत गुण आहे. त्यामुळे तो ज्या सामाजिक, भौगोलिक, आर्थिक व वैचारिक स्तराच्या सहवासात राहून लहानाचा मोठा होत असतो. त्यावेळी त्याला जीवनाच्या सर्वच टप्प्यांवर (बाल्यवस्था, तारूण्य, प्रौढ आणि वृद्धावस्था ) कळत-नकळत अनेक चांगल्या-वाईट सवयी जडत असतात. या सवयीतूनच त्याचा चांगला - वाईट स्वभाव घडत असतो, त्याचे चारित्र्य घडत असते किंबहुना यातूनच त्याचे चांगले - वाईट नशीबही घडत असते. परंतु सध्याचे एकविसावे शतक हे खरोखरच खूपच आव्हानांचं आहे. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी , टिकून राहण्यासाठी, पहिल्यांदा त्याला स्वतः मध्ये असलेल्या चांगल्या व चुकीच्या सवयी (हॅबिट्स) मधील फरक ओळखता येणं गरजेचं आहे. अधिक कार्यक्षम बनण्यासाठी, कार्यक्षमता (हायपरफॉर्मन्स) टिकून ठेवण्यासाठी, कार्यक्षमता वाढविण्यासाठी कोणत्या सवयी (हॅबिट्स) चांगल्या आहेत आणि त्या कशा आत्मसात करायच्या तसेच कोणत्या चुकीच्या सवयी आहेत व त्या तोडायच्या कशा ? याचं तंत्र व कौशल्य शिकून घेणं खूप महत्त्वाचे आहे. या पुस्तकात विद्यार्थी, युवक, महिला, गृहिणी, नोकरदार व व्यावसायिक इ. सर्वच प्रकारच्या व्यक्तींना आपापल्या कार्यक्षेत्रात यशस्वी होण्यासाठी अधिक कार्यक्षमता वाढविण्याचं वैज्ञानिक व शास्त्रशुद्ध तंत्र अगदी सहज सोप्या भाषेतून वाचायला मिळणार आहे.