ISBN : 978-93-6087-706-4
Category : Non Fiction
Catalogue : Self Help
ID : SB21456
Paperback
349.00
e Book
149.00
Pages : 152
Language : Marathi
बदल घडवणं हे जमिनीत बीज रोवून त्याची जोपासना करून वृक्ष बनविण्यासारखं आहे. "पेशन्स इज द की" तुम्ही जो विचार करता, तो कदाचित सत्य नसेल, पण तुम्ही जो विचार करता, तो सत्यात नक्कीच उतरतो. चिंता, अतिविचार आणि ताण यामुळे जर… तुम्हाला वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात अडकल्यासारखं वाटत असेल. तुम्हाला असं वाटत असेल की तुमची क्षमता किंवा कौशल्य तुमच्या आयुष्याच्या परिणामांमध्ये प्रतिबिंबित होत नाही. सध्याच्या आव्हानांचा विचार करून तुम्हाला भविष्याबद्दल अस्वस्थ करणारे विचार येत असतील. तुम्हाला असं वाटत असेल की तुमची खरी क्षमता अद्याप पूर्णपणे उलगडलेली नाही. तुम्हाला काही वाईट सवयींपासून मुक्त व्हायचं असेल, ज्या तुमच्या यशाच्या मार्गात अडथळा ठरत आहेत. तुम्हाला तुमचे जुने विश्वास/समजुतीचे धागे तोडायचे असतील, जे तुम्हाला मागे खेचत आहेत. तुम्ही मानसिक, भावनिक किंवा शारीरिक समस्यांना सामोरे जात असाल. तुम्हाला तुमच्या मन, भावना आणि विचारांवर प्रभुत्व मिळवायचं असेल. तुम्हाला तुमचं अपयशाचं चक्र बंद करून न्यूरल अचीव्हर सर्किट सक्रिय करायचं असेल. तर हे पुस्तक तुमच्यासाठी आहे! ही केवळ एक पुस्तक नसून, एक कार्यशाळा आहे, जिथे तुमच्या समस्येचा मूळ कारण (Root Cause) ओळखून वरील सर्व विषयांवर मार्गदर्शन केले जाईल. या कार्यशाळेमधून तुम्हाला – ✅ चिंता आणि तणावातून मुक्ती मिळेल. ✅ अतिविचार करण्याच्या सवयीपासून सुटका मिळेल. ✅ स्व-संवाद म्हणजे काय आणि तो कसा बदलायचा, हे शिकता येईल. या पुस्तकात वरील सर्व समस्यांवर एन.एल.पी. पद्धतीने काउंसलिंग आणि ध्यानसाधना यांच्याद्वारे निश्चित समाधान मिळेल. चला तर मग, तुमच्या आंतरिक समतोलापासून (Balance) आंतरिक उच्चत्वापर्यंत (Excellence)च्या प्रवासाला सुरुवात करूया.