About Book
माती चिकित्सा विषयी सविस्तर माहिती देणारे हे पुस्तक आहे...
या पुस्तकात माती चिकित्साचा इतिहास, मातीचे प्रकार, मातीचे फायदे, मातीचे गुणधर्म असे बरेच मुद्दे अभ्यासून लिहिले आहे.
निसर्गोपचार अभ्यासक्रम करीता अती आवश्यक पुस्तक आहे...
About Author
उदयोन्मुख लेखिका कु. निधी अशोक धांडे – बुद्धिमत्ता, जिद्द आणि साहित्यनिर्मितीचा सुंदर संगम!
कु. निधी अशोक धांडे ही अत्यंत अभ्यासू, बुद्धिमान आणि साहित्याची आवड असलेली उदयोन्मुख लेखिका आहे. विशेष आनंदाची बाब म्हणजे, आपले शिक्षण सुरू असतानाच तिने डॉ. नंदकिशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुस्तक लेखनास सुरुवात केली.
अल्पवयातच वाचन, चिंतन, संशोधन आणि लेखनाची आवड जोपासत तिने साहित्यविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. तिचे दुसरे पुस्तक प्रकाशित होत आहे, ही निश्चितच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद बाब आहे.
निधीच्या बुद्धिमत्तेविषयी, अभ्यासू वृत्तीविषयी आणि लेखनातील कल्पकतेविषयी खूप काही सांगण्यासारखे आहे. ती केवळ एक विद्यार्थिनी नसून ज्ञानाची ओढ असलेली, नवनवीन विचार आत्मसात करणारी आणि आपल्या लेखणीतून विचार मांडणारी एक प्रतिभावान लेखिका आहे.
तिने अत्यंत परिश्रमपूर्वक आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने पुस्तकाची निर्मिती केली आहे. तिच्या या साहित्यिक प्रवासात भविष्यात अनेक उत्तम साहित्यकृती वाचकांसमोर येतील, असा मला विश्वास आहे.
तिच्या या यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! तिची लेखणी अशीच बहरत राहो, ज्ञानाची उंच भरारी घेत राहो आणि साहित्यविश्वात तिने आपले स्वतंत्र स्थान निर्माण करावे, हीच सदिच्छा!
कु. निधी अशोक धांडे हिला भावी शैक्षणिक व साहित्यिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
— डॉ. नंदकिशोर अरुण पाटील