About Book
एक पाउल चुकीचे हे पुस्तक त्या लोकांकरीता आहे जे लोक चुकी झाली की दु:खी होउन नैराश्य जीवन जगत असतात व दु:खी होतात आणि त्या दु:खातुन बाहेर येण्याचा त्यांना कोणताही मार्ग सापडत नाही त्यामुळे ते आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न करतात. आणि कधीकधी जीवन संपवुन टाकतात. त्यांना मार्गदर्शन व्हावे या साठी जीवनाच्या विविध बाबीचा अभ्यास करुन व भुतकाळात झालेल्या चुका पासुन शिक घेवुन वर्तमान व भविष्यकाळ सुखद जावा या साठी पुस्तकाची निर्मिती केली आहे. जर सुखी जीवन जगायचे असेल किवा चुकीतुन यशाकडे जायचे असेल तर हया पुस्तकाचा फायदा होउ शकतो. आणि पुस्तकाच्या माध्यमातुन आपले जीवन सुखी करु शकतो. चुक का होते व कोणत्या चुकी मुळे कोणते दु:ख येते आणि त्या दु:खातुन मुक्ती कशी मिळु शकते या साठी या पुस्तकात काही कहाण्या,कथा यांचा संदर्भ घेतला आहे. व सरळ व सोप्या भाषेत शब्दाची मांडणी केली आहे जे सामान्य लोकांना समजु शकेल याचे विशेष ध्यान देवुन कोणाचेही चुकीच्या दिशेने पाउल पडु नये व पडले तरी त्यातुन बाहेर कसे पडावे याचे उपाय सागंण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे.
About Author
लेखक प्रविण तायडे यांचा जन्म ११ ऑगष्ट १९७६ रोजी महाराष्ट्रा मधील अमरावती जिल्हातील वाघोली बु या गावात झाला. त्यांना देशा करीता काहीतरी करावे असे लहान पणा पासुन वाटायचे त्या प्रेरणेणे प्रेरीत होउन त्यांचे दहावीचे शिक्षण झाल्यावर देश सेवे करीता आर्मी मध्ये भरती झाले. वयाच्या १८ व्या वर्षी सन १९९५ साली शिपाई या पदावर देशाच्या सेवेत सामील झाले व जीवनाचा सर्वणकाळ देशाला अर्पीत केला. आर्मी मध्ये १८ वर्ष सेवा देवुन महार रेजीमेंट मधील पाचव्या बटालीयन मधुन सन २०१२ मध्ये हवालदार या पदावरुन निवृत झाले आणि पुन्हा त्याच देश सेवेच्या प्रेरणेतुन पोलीस दलात भरती होउन अमरावती ग्रामीण पोलीस दलात आजपावेतो देश सेवा करत आहे. पोलीस दलात धावपळीचे कर्तव्य करुन पुस्तक लीहण्याचा छंद जीवंत ठेवुन पुस्तक लीहण्याचे कार्य चेवत ठेवले.
लेखकाने लहानपणा पासुन दु:खाला जवळुन पाहीले आहे त्या दु:खाचा अनुभव घेतला आहे तसेच त्यानी अनेक परीवार पाहीले जे दु:खाने त्रस्त होते त्यांना दु:खातुन मुक्तीचा मार्ग मिळत नव्हता एखादया चुकीला मोठे समजुन जीवन सपंवण्या सारखे कृत्य करतानी त्यांनी पाहीले त्या कारणाणे चुकीतुन यशाकडे कसे जाता येइल व दु:ख कसे कमी करता येइल त्यासाठी एक पाउल चुकीचे या पुस्तकाचे लीखाण सुरु केले. आपल्या लीखाणातुन दु:खी व्यक्तीचे चांगले होइल व त्याला आंनदाने जगता येइल या साठी अनेक बाबीचा अभ्यास करुन पुस्तक लीहण्याचे कार्य केले त्यांनी वाचका साठी पहीले पुस्तक मी अंगुलीमाल लीहुन वाचकाच्या सेवेत दिले. आणि दुसरे पुस्तक एक पाउल चुकीचे या पुस्तकाचे लेखण कार्य पुर्ण करुन वाचकाना अर्पण करत आहे. आगामी काळात येणारे तळखंड नावाचे पुस्तक लेखनासाठी घेतले आहे. काही दिवसात तळखंड नावाचे पुस्तक आपणास वाचायला मिळणार आहे.