Na
About book : “माहेरचा आहेर” हे पुस्तक त्या प्रत्येक आई साठी आहे जिची मुलगी सासरी गेलेली आहे. मुलीच्या आठवणीने आईच्या आठवणींना पाझर फुटतो. हे पुस्तक त्या प्रत्येक मुलीसाठी आहे जी लग्न झाल्यावर सासरी आल्यानंतर त्या नवीन घरात वावरताना, प्रत्येक प्रसंगी तिला माहेरची आठवण सतावत असते, आणि त्या आठवणीतून तिला तिच्या जीवनात उपयोग होतो हे प्रत्यक्ष उदाहरणं मी अनुभवली आहेत. त्याचा अनुभव घेण्यासाठी ह्या पुस्तकाचा उपयोग होईल. - - - - -
About author : अहमदनगर जिल्ह्यातील राहाता गावी , कवयित्रीचा, शेतकरी कुटुंबात २१ जुलै १९६५ रोजी जन्म झाला. शालेय शिक्षण गावात पूर्ण करून लोणी – प्रवरा येथे डॉ. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कॉलेज मध्ये कॉमर्स ची डिग्री प्राप्त केली. १९८५ साली लग्न झाले. काही कालावधीनंतर, कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत असताना, १९९५ साली अहमदनगर येथील न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज मध्ये, एम. ए. ( मराठी) या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. यादरम्यान कविता वाचनाची व लेखनाची गोडी लागली. त्यातूनच पुढे, अनेक विषयांवर कविता लिहिल्या गेल्या. अनेक साप्ताहिकातून व मासिकातून कविता प्रसिद्ध झाल्या. तसेच अहमदनगर व पुणे येथील आकाशवाणी केंद्रावर कविता वाचनाचे कार्यक्रम झाले. साल २००० दरम्यान, गुरूकॄपेने लिखाणाच्या स्वरूपात बदल होऊ लागला. आध्यात्मिक लिखाणात मन रमू लागले त्यातून अनेक हिंदी व मराठी भजने लिहून झाली. त्यातूनच “ सद्गुरूसा ना कोई जगतमें “ व “ वचनलीलामॄत “ ही दोन पुस्तके प्रकाशित झाली. २००० पूर्वी लिहिलेल्या “माहेरचा आहेर,” व “करंडा आणि रूपांतरण” या कविता संग्रहाला पुस्तक स्वरूपात वाचकांच्या हाती सोपवत आहे. “गुरू कॄपेची सरिता” या माझ्या यू ट्यूब चॅनल वर वचनायण भाग १ ते ९ , पौर्णिमा दर्शन, प्रपंचातून परमार्थ या वचनायणच्या सत्संग सेरिज आणि आत्म निवेदन भक्तीवरील कविता ऑडिओ रूपात उपलब्ध आहेत.