ISBN : 978-81-19908-70-7
Category : Fiction
Catalogue : Poetry
ID : SB20782
Paperback
170.00
e Book
99.00
Pages : 75
Language : Marathi
‘ करंडा आणि रूपांतरण ’ हे पुस्तक माझ्या सारख्या गॄहीणीच्या जिवंत अनुभवांचा निचोड आहे. संसार कसा फुलवावा आणि हे चालू असतांनाच जीवनात अध्यात्माच बीज कसे पेरावे? आणि ते अंकुरित होतानाची आपली मनस्थिती, आनंदाच्या अनुभूतीला कशी गवसणी घालते हे अनुभवायचं असेल तर हे पुस्तक आपल्यासाठीच आहे. ह्या पुस्तकातील रचना कवयित्रीच्या हृदयातील सुकोमल भावनांचे उमटलेले प्रतिबिंब आहे. कधी आपल्या प्रिय व्यक्ती विषयीच्या प्रेमासाठी विणलेला सुंदर शेला आहे, कधी गोड रागावणं आहे तर कधी वस्तूस्थितीची जाणीव करून देणे आहे. कधी विरहाच्या झळांची धगधगती आग आहे तर कधी प्रेमाला मुक्त सोडून देणे आहे. आपल्याच विश्वात रममाण होतांना समाजातील घडामोडींवर ही त्यांचे लक्ष आहे. ज्याला प्रेम करता येतं आणि ज्याच्या स्वभावात प्रेमाला अत्यंतिक महत्त्व आहे अशा जीवांसाठी यातील रचना मन मोहून घेतात. परिवर्तन हा संसाराचा नियम आहे त्यामुळे बदलणाऱ्या मन: स्थिती बरोबर विचारांमध्ये बदल होणं स्वाभाविक आहे. तशा यातील रचनेत बदल होत होत त्यांचे स्वरूप बदलू लागले. विचारत परिवर्तन घडवून आले की मन रूपांतरित व्हायला लागते, कालचे अनुभव आपल्याला आजच्यासाठी मजबूती देतात. जसे माती, खत, व पाणी घालून , गुलाबाच्या रोपट्याच झाडात रूपांतर होऊन