shashwatsuport@gmail.com +91 7000072109 B-75, Krishna Vihar, Koni, Bilaspur, C.G 495001
Mon - Sat 10:00 AM to 5:00 PM
Book Image
Book Image
Book Image
ISBN : 978-93-90761-57-9
Category : Fiction
Catalogue : Poetry
ID : SB20137

स्पर्श

K.A.Mogal

K.A.Mogal

Paperback
320.00
e Book
150.00
Pages : 205
Language : Marathi
PAPERBACK Price : 320.00

About author : लेखकाची माहिती के.ए.मोगल पुणे महाराष्ट्र ' राजहंस ' या नावाने कविता लेखन , महाराष्ट्र शासनाच्या सेवेतून स्वेच्छानिवृत्ती , स्वतःचे " दै.गणतंत्र दिशा ' हे वृत्तपत्र चालविले. नंतर " दै. गावकरी " या वृत्तपत्रात 2014 अखेर उपसंपादक सर्वधर्म समभावाचे पुरस्कर्ते परिवारात तीन मुली विवाहित एक हिंदू धर्मात एक ख्रिस्ती धर्मात तर तिसरी बौद्ध धर्मात रितसर विवाह स्थानिक वृत्तपत्रातून निरनिराळया सामाजिक विषयावर लेखन केले आहे .

About book : आपल्या जीवनात समाजात वावरताना आजूबाजूला अनेक घटना आपल्या पाहण्यात येतात. काही सुखद , काही दुःखद असतात. काही घटना मनातल्या कप्प्यात घर करून बसतात. काही घटना तर लेखकाच्या आणि कवी मनाच्या संवेदनशील लेखणीतून थेट कागदावर उतरतात. हवेतील गारवा, वीजांचा कडकडाट , कधी तुरळक तर कधी मुसळधार कोसळणारा पाऊस. कधी पावसाने ओढ दिल्याने होणारी बळी राजाची परवड याच संवेदनशीलतेने कधी चीत्र रूपात तर कधी कवी मनाच्या स्पंदनातून प्रकट झाल्याचे आपण अनेकदा अनुभवलेले आहे. एखाद्या ठिकाणचे वाढदिवस , लग्न, वर्षपूर्ती वा विवाहाचे आमंत्रण असो वा परिचित कुटुंबात घडलेली एखादी दुःखद घटना यापैकी कोणत्याही घटनेकडे संवेदनशील मन त्वरीत प्रतिक्रिया देतच असते आणि लेखक असो वा कवी याकडे निर्विकारपणे पाहूच शकत नाही. " भो क्रौंच मा विषाद कुरू !" हे जगातील.पहिले काव्य अवतीर्ण झाले ते अशाच सभोवताली घडलेली घटना पाहुन ; हि कवी मनाने त्वरीत व्यक्त केलेली काव्यात्मक प्रतिक्रिया होती हे आपण समजू शकतो. परंतु कविता ही वस्तुस्थिती वरच आधारित असावी असा काही नियम नाही. " जे न देखे रवि ते देखे कवी !" असे नमूद केले गेले आहे ते यामुळेच कविमनातील कल्पना, त्या मनात, त्याक्षणी उठणारे भाव तरंग हे कवितेतून व्यक्त होत असतात. ' स्पर्श ' हा कविता संग्रह त्यापैकीच एक आहे. काही अनुभवलेले तर काही कल्पना तरंग या कविता संग्रहात नम्रपणे सादर करीत आहे .

Customer Reviews


 

Book from same catalogue