The Perfect Beginning
5.0
About author : सौ. शीतल महेश माने M. B. A. Human Resource, Pune University. जन्म १९८३ साली महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्हयात चिपळूण येथे झाला. निबंध, कविता,कथा, कादंबरी, ललित लेखन, चारोळ्या इत्यादी प्रकारात लेखन केलेले आहे. दिवाळी अंकामध्ये कविता ,कथा, ललितलेख प्रकाशित झाले आहेत. ईरा ब्लॉगिंग तर्फे घेण्यात आलेल्या कथा व कादंबरी स्पर्धेत तीन कादंबऱ्यांना पहिल्या क्रमांकाचे नामांकन मिळाले आहे. सध्या वास्तव्य पती आणि मुली सोबत पिंपळे सौदागर, पुणे येथे आहे.
About book : हि कथा एका गृहिणीची असून स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठीची तिची धडपड यात मांडली आहे ... संघर्ष हा घरातूनच सुरू होतो.कोणताही त्रास नसताना सर्व सुख सोयी पायाशी असताना सुद्धा तिला तिचे स्वतःचे अस्तित्व धोक्यात येत आहे असे वाटू लागते . आपल्या पतीला आपली लाज वाटते कि काय असेही तिला वाटू लागते . संसाराच्या मध्यात आल्या नंतर एका स्त्रीच्या मनात होणारी खळबळ ह्या मध्ये आहे . जेव्हा तिच्या पतीला तिची हि व्यथा कळते तेव्हा तो आणि त्याची आई म्हणजेच तिची सासूबाई तिच्या मागे खंबीर पणे उभे राहतात आणि मग कशी ती शून्यातून तिचे विश्व निर्माण करते आणि एक यशस्विता बनते .. अशी हि तिच्या अयुष्याची प्रेरणादायी कथा आहे .. जी कि काल्पनिक आहे परंतु प्रत्येक गृहिणीला काहींना काही तरी करून दाखवण्यासाठी उर्मी निर्माण करणारी आहे.