shashwatsuport@gmail.com +91 7000072109 B-75, Krishna Vihar, Koni, Bilaspur, C.G 495001
Mon - Sat 10:00 AM to 5:00 PM
Book Image
Book Image
Book Image
ISBN : 978-93-93557-30-8
Category : Academic
Catalogue : Philosophy and Religion
ID : SB20197

पवित्रशास्त्र आणि त्याची धर्मतत्वे

No

Mr Vishwas Gorakhnath Valvi

Paperback
360.00
e Book
199.00
Pages : 299
Language : Marathi
PAPERBACK Price : 360.00

About author : लेखकाचा परिचय:- विश्वास गोरखनाथ वळवी हे नंदुरबार जिल्ह्यातील शिवपूर ( घोड्यावद ) या गावाचे रहिवासी असून ते महाराष्ट्रातील प्रसिद्ध आदिवासी आणि ख्रिस्ती साहित्यिक आहे.वयाच्या पस्तीसाव्या वर्षी त्यांनी साहित्यक्षेत्रात आपले अविश्वसनीय असे योगदान दिलेले आहे.आतापर्यंत त्यांची चार पुस्तके प्रकाशित झालेली असून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर १०२ शोधनिबंध प्रकाशित करण्याच्या त्यांनी विश्वविक्रम केलेला आहे.त्याची नोंद हाय रेंज बूक ऑफ वर्ल्ड रेकोर्ड्स या आंतरराष्ट्रीय संस्थेने ‘’MOST ARTICLES PUBLISHED BY A RESEARCH SCHOLAR ON HISTORY AND SOCIAL SCIENCES.’’ अशी केलेली आहे.तसेच युनिवर्सिटी ऑफ जेरूसलेमकडून मानद डी.लिट Ho.D.Litt ( Doctor of Literature) मिळविणारे ते भारतातील सर्वात तरुण आदिवासी आणि ख्रिस्ती साहित्यिक आहे.आतापर्यंत त्यांनी ७० ऑनलाइन कौर्सेस ख्रिस्ती धर्म,तत्वज्ञान,इतिहास आणि मिशनरी चळवळ इत्यादि विषयांवर पूर्ण केलेले आहे.शिक्षणक्षेत्रात त्यांनी M.A( History ).SET ( History ).M.Div ( Master of Divinity ).D.Min ( Doctor of Ministry ).D.Th ( Doctor of Theology ). Ph.D.( Pursuing ) इत्यादि पदव्या मिळविलेल्या आहे.तसेच ते राजीव गांधी राष्ट्रीय फेल्लोशिप अंतर्गत संशोधक विद्यार्थी म्हणून २०१६-२०२१ या काळात सामाजिक शास्त्रे प्रशाळा,इतिहास विभाग कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव,येथे पूर्णवेळ कार्यरत होते.विश्वास गोरखनाथ वळवी हे मराठी ख्रिस्ती साहित्य परिषदेचे आजीव सदस्य असून फोक्सक्ल्स या आंतरराष्ट्रीयन संस्थेने २०२१ वर्षासाठी सर्वोतम १०० लेखकांची हिंदुस्तान टाईम्स मार्फत जी यादी जाहीर केलेली आहे.त्या यादीत त्यांच्या नावाची नोंद करण्यात आलेली आहे.तसेच सेराफीम फौंडेशन संस्थेद्वारा ख्रिस्ती साहित्यात अमूल्य योगदान दिल्यामुळे स्मृतिचिन्ह व मेडल देऊन सन्मान करण्यात आला.तसेच त्यांना ग्लोबल स्कॉलर फाऊंडेशन या संस्थेकडून साहित्यक्षेत्रात अमूल्य योगदानार्थ भारतीय साहित्यरत्न अवॉर्ड जाहीर करण्यात आलेला आहेत.तसेच त्यांना अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघ बीड या सामाजिक संस्थेकडून लक्ष्मीबाई टिळक साहित्यरत्न पुरस्कार मिळालेले आहे.तसेच विल्यम कैरीचा नावाने हेल्पिंग हंड्स मिशन इंडिया या स

About book : ‘पवित्रशास्त्र आणि त्याची धर्मतत्वे’ हे पुस्तक प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीसाठी सुधारात्मक जीवन जगण्याची मार्गदर्शन पुस्तिका आहे.हे पुस्तक म्हणजे.?पवित्रशास्त्र आणि पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाचा अधीनतेत राहून कसे जीवन कंठीत करावे याचे सर्वोच ख्रिस्ती धर्मतत्वे विशद करते.आता हे मांडत असतांना ख्रिस्ती धर्मांतील वेगवेगळ्या धर्मपद्धतीच्या अभ्यास करणे अनिवार्य आहे.त्यामुळे लेखकाने मंडळी,बाप्तिस्मा ,आशा,विश्वास,प्रीती,पुढारीपण,पवित्रशास्त्र,सैतान,ख्रिस्त येशु,संत पाऊल,मिशनरी चळवळ,धर्मसुधारणा चळवळ,मंडळीचे इतिहासकार,आधुनिक चर्चचा इतिहास इत्यादी अनेक विषयावर छोटे-छोटे शीर्षक घेऊन त्यावर भाष्य केले आहे.तसेच या पुस्तकाचे खरे बळ म्हणजे ;सेंट ऑगस्टीन,ख्रिस्तोफर लव्ह प्यूरीटन,डोनाल्ड मैक्लोई,जॉन वेस्ली,जॉन पेटन,विल्यम वार्ड,विल्यम केरी,चार्ल्स स्पर्जन,मार्टिन ल्युथर,विल्यम केली,विल्यम मॅकडोनाल्ड,जॉन मॅकआर्थर,होरोटीस बोनार,रोलंड हिल,एन्ड्रू मुरे,विलियम स्टीम,जे आर मिलर,जे सी रायल,ए डब्लू पिंक,प्रो कोहेलर,जॉन न्युटन,जॉर्ज लींडले,जॉन बनियान,इव्हान हाप्कीन,स्टीव्हन ए क्रेलोप,नारायण वामन टिळक,पंडिता रमाबाई,जॉन ओवेन ,जॉर्ज व्हिटलफिल्ड,डग व्हान मीटर,ए टी रोबर्टसन,विल्यम हेनरीक्स इत्यादी ख्रिस्ती लेखकांची मते या पुस्तकात आढळून येतात.गेल्या बारा वर्षात अनेक शोधनिबंध मी लिहिले,उपदेश प्रचार केले,तसेच ख्रिस्ती धर्मावर माझे सर्वोत्कृष्ट मते जाहीर केली.त्या सर्व संदेशाचा सारांश म्हणजे ‘पवित्रशास्त्र आणि त्याची धर्मतत्वे’ हे पुस्तक होय.

Customer Reviews


 

Book from same catalogue

Books From Same Author