shashwatsuport@gmail.com +91 7000072109 B-75, Krishna Vihar, Koni, Bilaspur, C.G 495001
Mon - Sat 10:00 AM to 5:00 PM
Book Image
Book Image
Book Image
ISBN : 978-93-5426-076-6
Category : Fiction
Catalogue : Religioius
ID : SB20077

ओम गण गण लंबोदरा

Prasad Prakash Tupache

Paperback
377.00
e Book
321.00
Pages : 170
Language : Marathi
PAPERBACK Price : 377.00

About author : नमस्कार ! मी प्रसाद प्रकाश तुपचे , ( बी.ई. मेटल्रर्जी,ईपीजीडीबीएम) . बालपणापासून वाचनाची आणि लेखनाची रूची असल्याने एक दिवस आपण आपलं एखादं पुस्तक जरूर प्रकाशित करू असं वाटायचं. तो योग वयाच्या३७ व्या वर्षी आला. गेल्या १३ वर्षांच्या यशस्वी कॉरपोरेट करिअर मधे मिळालेलं ज्ञान , वेगवेगळे भलेबुरे अनुभव आणि लोकपरिचय यातून आपणही स्वत:ची एखादी तरी निर्मिती करावी ही प्रेरणा मिळाली आणि काम संपूर्ण झालं . शिक्षणाच्या निमित्ताने मला कवठे महाँकाळ, वालचंदनगर आणि पुणे इथल्या सम्रुद्ध ज्ञान संस्क्रुतीचा अनुभव मिळाला व ज्ञानधारणेचे सोप्यात सोपे मार्ग अनुभवता आले . अभियंता आणि व्यवस्थापक म्हणून कर्तव्य निभावत असताना कलेवरचं प्रेम सतत खुणावत होतं पण आपल्या तांत्रिक ज्ञानाची एक विशिष्ठ ऊंची आणि पातळी गाठेपर्यंत संपुर्ण वेळ तिथेच दिला होता. या वेळेनं मला गुणवत्ता विभाग प्रमुख बनवलं. तांत्रिक क्षेत्रामधे मी International Welding Technologist , ASNT Level II , Six Sigma Green Belt Holder ईत्यादी अनुभवाचे पात्रता निकष परिपुर्ण केले आहेत . भविष्यात ऊत्पादन क्षेत्रातले गुणवत्ता व्यवस्थापन या विषयातले माझे १३ वर्षांचे लोकहितैशी अनुभव सांगण्याचा नक्की प्रयत्न असेल. जीवनातले काही कठिण प्रसंग पुढचं जीवन सोपं बनविन्यासाठी येत असतात हा विश्वास आणि अनुभव आहे. नियमित करिअरमधले काही अनपेक्षित व्यत्यय सुप्त अंगीभूत स्रुजनशीलतेची बहुविध कवाडे ऊघडतात. असचं एक दार ठोठावण्याचा प्रयत्न मी या काव्यसंग्रहातुन केला आहे . आता प्रतिक्षा आपल्या प्रतिसादाची ! Authorpreneurship चं एक पाऊल! कळावे , लोभ असावा! आपला विनित, प्रसाद प्रकाश तुपचे .

About book : सन्माणणीय संपादक आणि सन्माणणीय पब्लिकेशन टीम , मी, प्रसाद प्रकाश तुपचे , वय ३७ , शिक्षण – बी.ई. (धातुशास्त्र ) आणि ईपीजीडीबीएम (व्यवस्थापन) , रा.शिवरत्न कॉलनी, काळेवाडी, पिंपरी, पुणे-१७ , माझा पहिला काव्यसंग्रह -  गण गण लंबोदरा - याची थोडक्यात ओळख करून देत आहे . या विषयी आपलं मोलाचं मार्गदर्शन, सुचना आणि अभिप्राय सर्वथा स्वागतार्ह ! साल २०२० हे आव्हानांच वर्ष आहे यात मुळीच शंका नाही . जीवनातल्या अनेकानेक कठिण प्रसंगात जेव्हा माणुस सर्व शक्तिनिशी आपल्या कार्यसिद्धीसाठी अतोनात मेहणत करत असतो , तेव्हा ती मेहणत ईश्वराला पोहोचत असते आणि तिथून आपल्या सर्व ऐहिक मनोकामना नि:शंक पुर्ण होत असतात अशी माझी आणि सर्वसाधारण आस्तिक मनाची धारणा आणि श्रद्धा ! जीवनात श्रद्धा , विश्वास , प्रेम , प्रेरणा यासोबतच स्वतंत्र अभिव्यक्ती आणि तिचं समयोचित ऊत्थान हेदेखील तितकचं मह्त्वाचं. कोविड-१९ च्या वेगळ्या वातावरणात मानवी मनाची घालमेल आपण सर्व जण पाह्त आहोत, अनुभवत आहोत . या कष्टमय भावनांना काही काळ विसरण्यासाठी वाचनासारखं औषध नाही आणि जीवनाची रसिकता टिकवून ठेवण्यासाठी कवितेसारखी सोबत नाही . नाही का ? मग मला सुचलेली कविता, त्याला ओघानं जमलेली चाल , मग सुचत गेलेले समर्पक शब्द ,त्या शब्दांमधे गुंफलेले अर्थ , त्या अर्थांमधून ऊलघडलेला कवितेचा बाज आणी त्या बाजाचं लोकजीवनाशी असणारं अतुट नातं आणि मग काही क्षणापुरतं विसरलेलं वास्तव, हे सर्व वेदनांच परिमार्जन करण्यास रास्त ऊपयुक्त असतं असं मला वाटतं ! कविकल्पनांचा परिचय जर आनंदनिर्मितीसाठी पोषक ठरणार असेल तर कठिण काळात मधुर आणि आश्वासक शब्दांच मह्त्व वेगळचं! आपण माझ्या या मताशी नक्कीच सहमत व्हाल ! वेदनांची वाट प्रार्थनेच्या फुलांनी सुगंधीत होऊन संकटावर मात करण्याचं नीतिधैर्य बहाल करते ,यामधे कुणाचं दुमत असेल असं मला वाटत नाही . अशाच काही प्रार्थना , काही आर्जवे , काही स्फुर्तीगीते , काही शिवगीते , काही प्रेमगीते , काही लोकगीते यांच समग्र संकलन म्हणजे , ३३ फुलांची काव्यांजली -  गण गण लंबोदरा !!! काव्यसंग्रह श्रीगणेशाच्या ‘गण गण लंबोदरा ‘या सुश्राव्य शीर्षकगीताने भक्तिरसात सुरू होतो आणी ‘ घर ‘ या सर्वांच्या मुलभूत शक्तिस्थळाजवळ येऊन थांबतो ,’सार्थक ‘ जवळ ! इथे श्रीक्रिष्णांच्या अंगाईगीतातून यशोदामातेची ह्ळुवार ममता पण आहे

Customer Reviews


 

Book from same catalogue