ISBN : 978-93-93557-44-5
Category : Non Fiction
Catalogue : Sports
ID : SB20200
Paperback
240.00
e Book
149.00
Pages : 125
Language : Marathi
वजन उचलण्याचे व्यायाम जास्त फायदेशीर की कार्डिओव्हॅस्क्युलर व्यायाम जास्त फायदेशीर हा वाद गेल्या कित्येक वर्षांपासून चालू आहे. वजन कमी करणे किंवा लठ्ठपणा (फॅट) कमी करण्यासाठी कार्डिओ व्हॅस्कुलर व्यायाम करणेच योग्य आहे असा एक सर्वसामान्य मतप्रवाह आहे. वजन उचलण्याच्या व्यायामा बद्दलच्या या गैर समजुतींमुळे आणि चुकीच्या मतांमुळे ,जिम मध्ये जाणारे खूप लोक वजन उचलण्याच्या व्यायामा मुळे मिळणाऱ्या फायद्यांपासून वंचित राहतात. वजन उचलण्याच्या व्यायामा बद्दल अजून एक गैर समज हा आहे की स्त्रियांनी हे व्यायाम करू नयेत कारण त्यांनी जर हे व्यायाम केले तर त्यांचे शरीर पण पुरुषांसारखे पिळदार बनेल. त्यामुळे बहुतेक जिम्स मधील कार्डिओ विभाग हा स्त्रिया आणि मध्यमवर्गीय लोकांनी भरलेला असतो. खरेतर सत्य हेच आहे की वजन उचलण्याचे व्यायाम हे वजन किंवा लठ्ठपणा कमी करण्यासाठी सर्वात योग्य आहेत. वजन उचलण्याचे व्यायाम करण्यासाठी भरपूर (उष्मांक ) कॅलरीज तर वापरल्या जातातच पण त्याचवेळेस हे व्यायाम करण्यामुळे शरीराचा चयापचय दर ( मेटाबॉलिजम) पण वाढतो जो शरीराचे वजन आणि शरीरातील लठ्ठपणा कमी करण्यासाठी अतिशय आवश्यक आहे. तरुण मुलें ज्यांना वजन उचलण्याचे व्यायाम खूप आवडतात , ती दोन प्रकारात मोडतात. पहिल्या प्रकारात ती मुलें येतात जी जिम ला कधी गेलीच नाहीत आणि त्यांना जिम मध्ये जायला संकोच वाटतो किंवा ज्यांना वजन उचलण्याच्या व्यायामाबद्दल फारशी माहिती नाही आहे. जर ती मुलें कधी जिमला गेली तर त्यांना पहिले काही दिवस जिम मधील ट्रेनर्स वजन उचलण्याचे व्यायाम शिकवतात आणि नंतर त्यांना शिकवणे बंद करतात कारण जिम मध्ये खूप मेंबर्स असल्यामुळे ट्रेनर्स कडे वेळ नसतो ट्रेनर्स ना स्वतःलाच वेगवेगळ्या व्यायामांच्या प्रकाराबद्दल जास्त माहीत नसते ट्रेनर्स ना व्यक्तिगत शिक्षण ( पर्सनल ट्रेनिंग ) देण्यात जास्त रस असतो ज़े बहुतेक सामान्य मुलांना परवडत नाही . दुसऱ्या प्रकारात ते लोक येतात ज़े वजन उचलण्याचे व्यायाम करणारे सराईत लोक आहेत आणि बऱ्याच कालावधी पासून वजन उचलण्याचे व्यायाम करत आहेत. या लोकांचा शरीर पिळदार बनवण्याचा वेग थोडासा थांबल्यासारखा आहे आणि ते एका ठराविक मर्यादेपलीकडे जास्त प्रगती करू शकत नाही आहेत. त्यांना कोणाचे मार्गदर्शन घ्यावे हे कळेनासे झाले आहे कारण जिम मधील ट्रेनर्सनाच बॉडी बि