No
About author : मी हृदयाच ऐकतो. त्यास सर्वकाही माहीत असते!
About book : खरं सांगायच झालं तर; काय करू, कसं लिहू, मला जमेल का, अशा अनेक प्रश्नांनी माझ्या भोवती गर्दी केली होती. मी अनेकदा टाळाटाळ करायचो. लिहू, पाहू, राहू दे; अशा शब्दांची यादीच जणू मी पाठ केली होती. पण नंतर जसेजसे दिवस जात गेले तसंतसं मला जाणीव होत गेली आणि ह्या विषयाबद्दल मी थोडा थोडा अभ्यास करायला सुरुवात केली. आवड हळुहळू वाढत गेली. मी लिहीत राहिलो, शब्दाला शब्द जोडत गेलो, मन रमत गेले, संग्रह करीत राहिलो. मी संकेत देशमुख; राहणार आंबेवणी गावचा. झाडे खुप दाट आणि लोकवस्ती फार विरळ! अशा परिस्थितीत आणि मनस्थितीत मी लहानचा मोठा झालो. माझं शालेय शिक्षण सुद्धा अगदी हाकेच्या अंतरावर असणार्या विद्यालयात झालं. सर्व काही एकाच जागी असल्यामुळे माझं विश्व मर्यादित होतं. वडिलांनी कधीही कुठल्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही आणि आईने कधीही उपाशी झोपू दिले नाही. एकत्र कुटुंबात लहानच मोठा झालो. ह्या सगळ्यात माझ्या आजोबांची भूमिका खूप महत्वपूर्ण होती. आणि त्या नंतर येतात ते माझे वडील. ते माझ्यासाठी एका कल्पतरू प्रमाणेच आहेत. हे सगळं असता एकांत हा माझ्या आवडीचा विषय होऊन गेला. मन रमत गेल, सुचलेलं लिहीत गेलो. त्याचा संग्रह केला. आणि आत्ता तुमच्या हातात असलेला "हर्षवेडा" हा माझ्या अगदी सुरुवातीला लिहिलेल्या बेचाळीस कवितांचा एक संग्रह तुम्ही वाचत आहात.