काव्यसंग्रह
About book : प्रत्येक माणूस हा निसर्गातील ऋतूप्रमाणे, ठराविक वेळेनुसार बदलत असतो. माणूस एक असला तरी तो वयानुसार आणि वेळेनुसार त्याच्या छटा बदलत असतो किंबहुना त्या बदल्या जातात. प्रत्येक वेळी प्रत्येक दिवशी माणूस आधिपेक्षा वेगळा अन् नाविन्यपूर्ण वाटत असतो. या पुस्तकात नवरसातील विविध रस, विर, श्रृंगार, करुना असे रस सामाऊन घेऊन त्यांच्या जीवनातलं महत्त्व सांगण्याचा हा छोटासा प्रयत्न केला आहे, जगण्याच कौशल्य नि मरणाचा थाट अनुभवण्यास मदत करणारा हा काव्यसंग्रह. या कवितेच्या माध्यमातून एकमेकांशी अन निसर्गाशी जोडण्याचा, काही नविन/ नाविण्यपूर्ण शिकण्याचा एक छोटासा प्रयत्न. या कविता काही काल्पनिक काही कव: अनुभवातून तर काही इतरांच्या अनुभवातून लिहील्या गेल्या आहेत. आजकालच्या धावपळीच्या जिवनात आपल्याला स्वतःला दयायला वेळ असतो का ? जर उत्तर "हो" असेल तर तुमच्या सारखे भाग्यवान दुसरे कोणीच नाही आणि जर उत्तर "नाही" असेल तर वेळ काढा स्वतःसाठी आपण काम करतो पदवी घेत असतो ते कशासाठी तर आपल्याला सुखी जिवन जगता याव म्हणून आणि म्हणूनच स्वतःला वेळ देता यावा आणि आपण पाहीलेल्या अनुभवलेल्या आणि शोध घेतलेल्या गोष्टी कवितेच्या रूपात तुमच्या समोर मांडण्याचा मी हा लहाणसा प्रयत्न केला आहे. ऋतुजा भोगूळकर
About author : मी चुकले चुकत गेले त्यातून प्रत्येकवेळी नव काही शिकत गेले. शिकत शिकत घडले नि कविता लिहीण्या योग्य झाले.एखादया झाडाच्या फांद्यां प्रमाणे लांब पर्यंत पसरलेले विचार त्याच्या बुंध्यांकडे म्हणजेच आपल्या मणापर्यंत पोहण्यासाठी आपल्या आयुष्यात घडत असलेल्या आणि घडणाऱ्या गोष्टीना आपल्याला एका कवितेच्या रूपात पाहता याव म्हणून या कवितासंग्रहाची निर्मीती करण्यात आली.