About Book
“यशस्वी दुग्ध व्यवसायासाठी पशुआहार व्यवस्थापन” या पुस्तकांमध्ये गायी, म्हशी यांचे विविध शारिरीक अवस्था यामध्ये करावयाचे आहार नियोजन, ऋतूमानानुसार आहार नियोजन, दुधाची प्रत व आहार, चारा उत्पादन व्यवस्थापन, मुरघास बनवणे, निकृष्ठ चा-यावरती प्रक्रिया, अझोला उत्पादन तसेच दुध उत्पादनाच्या प्रमाणात चारा व खुराक यांचे प्रमाण, घरच्या घरी पशुखाद्य निर्मीती व इतर महत्वाच्या विषयावर सविस्तर माहिती दिलेली आहे.
About Author
लेखकाविषयी :- डॉ. प्रफुल्लकुमार वसंतराव पाटील
शिक्षण:- एम. व्हि. एस्सी, पीएचडी, पीजीडीअेडब्लु, नेट(पशुपोषण शास्त्र)
2005 ते 2008 पर्यंत पशुवैद्यकीय अधिकारी म्हणुन राजारामबापु पाटील सहकारी दूध संघ इस्लामपुर जि. सांगली येथे कार्य केले. सन 2008 ते आजतागायत 15 वर्षे प्रक्षेत्र व्यवस्थापक म्हणून पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर येथे कार्यरत. एकुण 06 पुस्तके प्रसिध्द, संशोधनपर 41 लेख प्रसिध्द, तांत्रिक लेख 31, मराठी लेख 275, 7 प्रशिक्षण पुस्तिकाचे संपादन केले. 21 प्रशिक्षणे व 100 हुन अधिक शेतकरी मेळाव्यांचे आयोजन व मार्गदर्शन केले. पशुआरोग्य शिबीर तसेच 30 हुन अधिक पशुप्रदर्शनामध्ये तज्ञ म्हणून काम केले. 200 हून अधिक प्रात्यक्षिकाव्दारे शेतक-यांना मार्गदर्शन केले. चार वेळा उत्तम संशोधनपर लेख प्रसारणासाठी राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार, विविध राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त. शैक्षणिक अनुभव 06 वर्षे.
डॉ. मत्स्यगंधा किशनराव पाटील
शिक्षण :- एम. व्हि. एस्सी, पीजीडीअेडब्लु, पीएचडी (पशु औषधनिर्माणशास्त्र व विषशास्त्र)
सन 2008 ते आजतागायत 15 वर्षे सहाय्यक प्राध्यापक म्हणून पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर येथे कार्यरत. सहलेखिका म्हणून 02 पुस्तके प्रसिध्द, संशोधनपर 45 हून अधिक लेख, तांत्रिक लेख 40, मराठी लेख 148 प्रसिध्द, 05 प्रशिक्षण पुस्तिकांचे संपादन, महिला व मुलीसाठी विविध प्रशिक्षण, चर्चासत्रांचे आयोजन केले. राष्ट्रीय पातळीवर 02 व राज्यस्तरील 03 पुरस्कार प्राप्त. पदवीत्तर 03 विद्यार्थ्याचे संशोधन मार्गदर्शक व 20 हून अधिक पदवीत्तर विद्यार्थ्याच्या संशोधन मार्गदर्शन समितीमध्ये सदस्य. विविध एजन्सी योजनामध्ये संशोधक व सहसंशोधक म्हणून कार्य. विविध पशुआरोग्य शिबीरे, राष्ट्रीय विकास योजना शिबीरे तसेच पशुप्रदर्शनामध्ये हिरहिरीने सहभाग.