support@shashwatpublication.com +91 7000072109 B-75, Krishna Vihar, Koni, Bilaspur, C.G 495001
Mon - Sat 10:00 AM to 5:00 PM
Book Image
Book Image
Book Image

ISBN : 978-93-7462-328-2

Category : Non Fiction

Catalogue : Self Help

ID : SB22327

द वूमन आय चुज टू बिकम

स्वतःला हरवल्यानंतर पुन्हा स्वतःलाच शोधण्याचा प्रवास

गीतांजली सरडे

Paperback

219.00

e Book

149.00

Pages : 64

Language : Marathi

PAPERBACK Price : 219.00

About Book

कधी कधी आयुष्य आपल्याला अशा वळणावर आणून उभे करते, जिथे बाह्यतः सर्व काही सुरळीत दिसत असते; मात्र अंतर्मनात आपण हळूहळू तुटत असतो. “द वूमन आय चुज टू बिकम” हा केवळ संघर्ष आणि दुःखाचा प्रवास नाही; हा स्वतःला पुन्हा शोधण्याचा, स्वतःवर प्रेम करायला शिकण्याचा आणि आपल्या आयुष्याची जबाबदारी स्वतःच्या हातात घेण्याचा प्रवास आहे. या पुस्तकातून लेखिका सांगतात की बदलाची सुरुवात नेहमी परिस्थिती बदलण्यापासून होत नाही. अनेकदा ती सुरू होते स्वतःकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्यापासून. Self-love, boundaries, forgiveness, emotional detachment, self-awareness, mindset, discipline आणि conscious choices यांच्या माध्यमातून स्वतःमध्ये झालेला बदल लेखिका अत्यंत प्रामाणिकपणे मांडतात. हे पुस्तक केवळ प्रेरणा देण्यासाठी नाही, तर स्वतःला काही महत्त्वाचे प्रश्न विचारण्यासाठी आहे. मी नेमकी कोण आहे? मला खरोखर काय हवे आहे? काय माझ्या नियंत्रणात आहे? मी काय सोडून देऊ शकते? आणि माझ्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी आज मी काय करू शकते? जर तुम्ही स्वतःला कुठेतरी हरवले असेल, सतत इतरांना आनंदी ठेवण्याच्या प्रयत्नात स्वतःला विसरले असाल किंवा आयुष्य नव्याने सुरू करण्याची इच्छा मनात बाळगत असाल, तर हे पुस्तक कदाचित तुमच्यासाठीच आहे. कारण आयुष्य बदलण्यासाठी नेहमी दुसऱ्या कोणाच्या मदतीची आवश्यकता नसते. कधी कधी स्वतःचीच एक ठाम निवड पुरेशी असते.


About Author

गीतांजली सरडे या स्वतःच्या अनुभवांतून शिकलेल्या गोष्टी इतरांपर्यंत पोहोचवण्याची इच्छा असलेल्या लेखिका आहेत. तसेच, त्या Life & Relationship Coaching क्षेत्रात कार्य करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. आयुष्यातील अनेक भावनिक चढ-उतार, नात्यांमधील गुंतागुंत, स्वतःवरील विश्वासाचा अभाव आणि त्यातून झालेल्या अंतर्मुख प्रवासाने त्यांना स्वतःला नव्याने समजून घेण्याची संधी दिली. Meditation, journaling, self-reflection, spirituality, reading आणि सातत्यपूर्ण self-growth यांना आपल्या परिवर्तनाच्या प्रवासाचा भाग बनवत त्यांनी स्वतःमध्ये हळूहळू सकारात्मक बदल घडवून आणला. आज त्या महिलांना स्वतःला समजून घेण्यासाठी, स्वतःचा आवाज ऐकण्यासाठी, boundaries निर्माण करण्यासाठी आणि अधिक conscious आयुष्य जगण्यासाठी प्रेरित करू इच्छितात. त्यांचा ठाम विश्वास आहे— “आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर आपले नियंत्रण नसते; परंतु त्यांना आपण कसे प्रतिसाद देतो, कोणते निर्णय घेतो आणि पुढे कसे वाटचाल करतो—हे आपल्या हातात असते.”

Customer Reviews


 

Book from same catalogue