shashwatsuport@gmail.com +91 7000072109 B-75, Krishna Vihar, Koni, Bilaspur, C.G 495001
Mon - Sat 10:00 AM to 5:00 PM
Book Image
Book Image
Book Image
ISBN : 978-93-95362-52-8
Category : Fiction
Catalogue : Novel
ID : SB20369

त्याला खरंच जगायचं होतं

not any

Vijaya Parbat

Paperback
699.00
e Book
299.00
Pages : 277
Language : Marathi
PAPERBACK Price : 699.00

About author : मी विजया परबत, सध्या श्री संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढा या ठिकाणी असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे. तसेच सोलापूर युनिव्हर्सिटी या ठिकाणी Ph.D (English Literature)करत असून, मला लेखनाची आवड आहे.

About book : सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारी ही माझी पहिली कादंबरी आपणासमोर घेऊन येताना मला खूप आनंद होत आहे. या कादंबरीचे हिंदी एडिशन सुद्धा उपलब्ध असून येत्या काही दिवसात ती इंग्रजीमध्ये सुद्धा आपण वाचू शकाल. स्पर्धेच्या आट्टहासात पालक मुलांच्या मनाचा विचारही करत नाहीत; पण हे ना पालकांच्या लक्षात येतं ना त्या ओझं वाहणाऱ्या मुलांच्या. सतत नको असलेल्या दडपणाखाली वावरताना त्यांच्यातील खरे कलागुण कायमचेच लपून राहतात; नाहीतर मग उघड झाले तरी त्यांची स्थिती दिग्विसारखी होते. त्याला तसं खरंच जगायचं असूनही तो क्षणाक्षणाला तसा मरतच होता; पण हे सगळं समाजाला कधी पटणार? की दिग्विजय सारख्या अनेकांचा बळी असाच जात राहणार, त्याच ओझ्याखाली. मुलांची होणारी घुसमट दिग्विच्या उदाहरणातून पाहता येते. त्याची कॉलेज लाइफ, त्याची फंकी-शंकी मित्र कंपनी, त्याचं ते हळवं मन, त्याचा एकटेपणा, त्याची जिद्द, समजूतदारपणा, कोसळून पुन्हा उठण्याचे सामर्थ्य अशा अनेक गोष्टी या कादंबरीमध्ये पाहायला मिळतात ज्या सामान्य माणसाला जगण्याची प्रेरणा देतात. प्रतिकूल परिस्थिती मध्ये दिग्वि ने स्वतः मधील कलाकार शोधण्याचा केलेला प्रयत्न खरंच वाखाणण्याजोगा आहे. त्याचे विचार नेहमीच धडपडणाऱ्याला वाट दाखवतील, झोपलेल्यांना उठवतील, अन्यायाविरुद्ध आवाज उठवतील, लोकांना जागृत करतील आणि पुन्हा लढायला प्रवृत्त करतील. त्या आई-बाबांना शहाणे करतील जे मुलांच्या डोक्यावर स्वतःच्या अपेक्षांचे ओझे देऊन मोकळे होतात. त्यांना विचार करायला लावतील... ज्यांच्याजवळ पैसा आहे; पण वेळ नाही, बुद्धी आहे पण भावना नाहीत. धावपळीत जीवन जगणाऱ्या या मायानगरीतील त्या असंख्य पालकांना त्याचे विचार धडा देतील.

Customer Reviews


 

Book from same catalogue