ISBN : 978-93-6087-621-0
Category : Non Fiction
Catalogue : Life Style
ID : SB21513
Paperback
380.00
e Book
199.00
Pages : 185
Language : Marathi
प्रेमाच्या महासागरामध्ये प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने पोहावेसे वाटत असते. पण काहीजण अशा अथांग प्रेमरूपी महासागरामध्ये बुडून जातात, काहीजण बुडता बुडता वाचतात, तरंगतात, तर काहीजण हा प्रेमाचा सखोल प्रवास स्वतःच्या विश्वासावर समजूतदारपणावर आणि ताकदीवर शेवटपर्यंत किनाऱ्यापाशी घेऊन जातात. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रेमाला एक महत्त्वाचे स्थान आहे; मग ते आई-बाबांवर असो, आजी आजोबांवर असो, आपल्या मुलांवर असो, आपल्या परिवारावर असो, किंवा आपल्या जोडीदारावर. आपल्यालाही या प्रेमाच्या असीमित प्रवासात आपल्या मनाप्रमाणे परंतु इतरांना न दुखावता जीवनात यशस्वी होता आले पाहिजे, एकमेकांना समजून घेता आले पाहिजे, एकमेकांच्या गरजा ओळखता आल्या पाहिजेत, आपापसातील वाद तितक्याच चातुर्याने पटकन मिळवता आले पाहिजेत, कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वतःची मनस्थिती शांतपणे टिकवता आली पाहिजे. थोडक्यात काय तर स्वतःच्या जीवनाचे व्यवस्थापन आपल्याला योग्य पद्धतीने करता आले पाहिजे आणि या पुस्तका मार्फत आपण कशाप्रकारे आपला खडतर व कठीण जीवन प्रवास आनंददायी आणि सोपा करू शकतो याविषयी लेखिका प्रो. प्रिती राणे यांनी त्यांच्या जीवनातील अनुभवांचा खजिना आणि अनमोल विचारसरणी या पुस्तकरूपी दागिन्यात तुमच्यासमोर आणले आहेत. आपले जीवन हे रत्नांपेक्षाही मौल्यवान आहे आणि या पुस्तकातील लेखिकेने मांडलेले विचार आपण आचरणात आणलेत तर नक्कीच आपल्या विवेक बुद्धीला चालना मिळेल. आशा आहे हे पुस्तक आपल्याला जीवनात अधिक सहाय्यक ठरेल आणि जगण्याची नवी दृष्टी देईल.