एका शूर योद्धयाची विलुप्त कहाणी.
5.0
About author : मी उपेंद्र धांडे उर्फ प्रेम धांडे.मूळ रहिवासी रावेर,जि.जळगाव,महाराष्ट्र. सध्या मुंबई इथं वास्तव्यास आहे.औदुंबरावत ही माझी पहिलीच कादंबरी.लिखाणासोबतच मी मराठी टी.व्ही मालिकांमध्ये ‘निर्मिती व्यवस्थापनाचं’ कार्य करतो.नुकतंच मी ‘कलर्स मराठी’ या वाहिनीवरील ‘बाळूमामाच्या नावानं चांग भलं’ या मालिकेत निर्मिती व्यवस्थापनाचं कार्य पार पाडलं. औदुंबरावतच्या कथेचं संशोधन मी २०१८ साली सुरु केलं.त्यानंतर औदुंबरावतच्या समकालीन तीन कथा माझ्या निदर्शनात आल्या. ह्या कथा अतिशय रंजक आणि रहस्यमय आहेत. म्हणून मी तीनही कथांचा विस्तार करण्याचा मोह आवरू शकलो नाही. तीन कथांच्या मालिकेतील पहिली कथा औदुंबरावत साम्राज्याचा राजपुत्र वीरबाहूची आहे,दुसरी अश्मकं साम्राज्याचा युवराज रायसेनची आहे आणि तिसरी हैहेय वंशीय राजकुमार सहस्त्रबाहूची कथा आहे.
About book : ख्रि.पू ६०००, श्रीराम जन्माच्या एक हजार वर्षांपूर्वी मध्य-दक्षिण भारतवर्षात तीन दैदीप्यमान साम्राज्य अस्तित्वात होती.विदर्भ प्रदेशात 'औदुंबरावत साम्राज्य’, गोदावरी तटावर ‘अष्मकं साम्राज्य’ आणि नर्मदा नदीच्या काठावर ‘महिष्मती साम्राज्य’! या तीन साम्राज्यांतील तीन महापराक्रमी योद्धयांच्या जीवनाचा वेध घेणाऱ्या तीन पुस्तकांच्या मालिकेतील पहिले पुस्तक 'औदुंबरावत' हे आहे. तत्कालीन विदर्भ प्रदेशात औदुंबरावत साम्राज्याची राजधानी मेळघाट नजीक औदुंबरावत हे नगर होते. पुढे या नगराच्या नावाचा अपभ्रंश होत गेला - औदुंबरावत-उंबरावत-उंबरावती आणि आताच्या आधुनिक युगात हे नगर अमरावती नावानं ओळखलं जातं. मेळघाटच्या जंगलात राहणारा एक वनवासी योद्धा ‘वीरबाहू’. खरं तर तो जन्माने वनवासी होता आणि रक्ताने राजपुत्र! त्याच्या जन्मापूर्वी औदुंबरावत साम्राज्यात मोठं कारस्थान रचलं गेलं. वीरबाहूची माता महाराणी ‘पद्मिनी’ला नवमासाच्या वेदानांसहित जंगलात सोडण्यात आलं होतं.ते कारस्थान का रचण्यात आलं होतं?आणि कुणी रचलं होत? वीरबाहूच्या मातेला दिलेल्या वेदनांचा प्रतिशोध वीरबाहूने कसा घेतला होता? ह्याचं वर्णन करणारी ही रंजक कथा आहे. एक वनवासी योद्धा ते सम्राट होण्यापर्यंतचा वीरबाहूचा संघर्ष आहे - औदुंबरावत. अमात्य रुद्रभट्टच्या नरक यातनांनी त्रस्त झालेल्या प्रजेची कैफियत आहे – औदुंबरावत. औदुंबरावतच्या कथेचं संशोधन मी २०१८ साली सुरु केलं.त्यानंतर औदुंबरावतच्या समकालीन तीन कथा माझ्या निदर्शनात आल्या. ह्या कथा अतिशय रंजक आणि रहस्यमय आहेत. म्हणून मी तीनही कथांचा विस्तार करण्याचा मोह आवरू शकलो नाही. तीन कथांच्या मालिकेतील पहिली कथा औदुंबरावत साम्राज्याचा राजपुत्र वीरबाहूची आहे,दुसरी अश्मकं साम्राज्याचा युवराज रायसेनची आहे आणि तिसरी हैहेय वंशीय राजकुमार सहस्त्रबाहूची कथा आहे.