About Book
जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वासासारखं प्रभावी शस्त्र जर असेल.. तर झिरो टू झिरो व्हायला वेळ लागत नाही. या ताण-तणावाच्या परिस्थितीमध्ये होणारे शारीरिक त्रास कसे दूर करायचे. डिप्रेशन सारख्या महाभयंकर आजारातून, मानसिकतेतुन स्वतःला भक्कम कसे उभे करायचे. स्वतःच्या प्रतिभा वान क्षमता कशा ओळखायच्या त्यावर किती सूक्ष्म पद्धतीने काम करायचे. प्रत्येक क्षणी स्वतःला जिंकायचं असतं. मी स्वतःच्या शरीराला सुंदर सुडोल मेंटेन ठेवायचं असतं. आणि खरंच आनंदी जीवन हे बहुमोल असतं... यासाठी NLP टेक्निक आपल्या जीवनात मिळालेले एक वरदानच ठरतं....
About Author
टायगर आनंद पाठक हे प्रसिद्ध लाईफ कोच आहेत. ट्रेनर आणि मोटिवेटर आहेत.लोकांच्या जीवनामध्ये उद्भवलेले ताण तणाव कसे दूर करायचे, त्यांना डिप्रेशन मधून कसे बाहेर काढायचे, स्वतःची प्रतिभा कशी प्रफुल्लित करायची यासाठी ते योग्य मार्गदर्शन करतात. स्वतःच्या शरीराचं वजन कसं संतुलित ठेवायचं ते
NLP टेक्निक चा मेळ घालून मार्गदर्शन करतात. आर्मीवाले पाठक म्हणून त्यांची संपूर्ण शहरात ओळख आहे. त्यांचे संपूर्ण घराणं हे आर्मीचे राहिलेले आहेत. यामुळे त्यांच्या आचारा विचारात आर्मीचीच झलक पाहायला मिळते आहे.त्यामुळे आर्मीचे डिसिप्लिन आर्मीची आक्रमकता आर्मी ची शालिनीता लाभलेली आहे... संपूर्ण शिक्षण विदर्भ नागपूर येथे झालेला आहे. विदर्भाचा तो गोडवा आहे तो आचरणात विचारात आलेला आहे. इन्शुरन्स क्षेत्रामध्ये मोठा अनुभव आहे. त्यासोबत डायरेक्ट सेलिंग या क्षेत्राचा आपण अनुभव फार लांब आणि यशस्वी राहिलेला आहे. सध्या कर्मभूमी त्यांची पुणे येथे आहे. ते एक गौऊ सेवक आहेत. त्यांच्या आयुष्यात मोठे ध्येय घेऊन ते निघाले आहेत.. गौऊ,गायत्री, गंगा,गीता, यज्ञ आणि देश यांची सेवा आयुष्यभर करायची आहे. भारतीय सेनेला नंबर वन सेना जगामध्ये करायची आहे.. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आनंदी जीवन निर्माण करायचा आहे.. सेवा परमो धर्म त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी स्वतः लावून घेतलेली आहे.. समाजाचे समाजाला देऊन सेवा करायची आहे.. आपण एक निमित्त मात्र आहोत. जय हिंद जय भारत.